आगामी काळ खडतर असण्याची शक्‍यता

रुपया घसरूनही सरलेल्या आठवड्यात शेअरबाजार निर्देशांकांत भरीव वाढ

मुंबई: सरलेल्या आठवड्यात सुरुवातीला शेअरबाजारातील वातावरण बरेच सकारात्मक होते. त्यामुळे शेअरबाजार निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले. मात्र नंतर रुपया कोसळू लागल्याने आणि क्रुडचे दर वाढल्यामुळे शेअरबाजारात बरीच विक्री झाली. तरीही सरलेल्या आठवड्यात शेअरबाजार निर्देशांकांत भरीव अशी वाढ नोंदली गेल्याचे दिसून आले. आगामी काळात गुंतवणूकदार रुपयाच्या मूल्याकडे आणि क्रुडच्या दराकडे लक्ष ठेवून सावध व्यवहार करण्याची शक्‍यता आहे.

फेडरल रिझर्व्हने वेगात व्याजदरात वाढ करणार नसल्याचे सांगितल्यानंतर आणि अमेरिका आणि मेक्‍सिकोदरम्यान यशस्वी व्यापार करार झाल्यानंतर आठवड्याच्या सुरुवातीला जागतिक शेअरबाजाराबरोबरच भारतीय शेअरबाजारांचे निर्देशांक उसळले होते.

मात्र नंतर रुपयाची घसरण आणि क्रुडची दरवाढ सुरू झाली. त्यातच अमेरिकेने चीनवरील वस्तूवर 300 अब्ज डॉलरचे आयात शुल्क लावणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनेतून अंग काढून घेण्याची धमकी दिल्यानंतर शेवटच्या दिवसात बाजारात बरीच नफेखोर बळावली. सरलेल्या आठवड्यात एक वेळ मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 38989 अंकांपर्यत झेपावला होता. मात्र, नंतर त्यात बरीच घट होऊन हा निर्देशांक आठवड्याच्या पातळीवर 393 अंकांनी म्हणजे 1.03 टक्‍क्‍यांनी वाढून 38645 अंकावर बंद झाला.

त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी आठवड्याच्या पातळीवर 123 अंकांनी म्हणजे 1.07 टक्‍क्‍यांनी वाढून 11680 अंकावर बंद झाला.त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही या आठवड्यात अनुक्रमे 1.99 टक्‍क्‍यांनी व 1.95 वाढ झाल्याचे दिसून आले.

आठवड्याच्या शेवटी जागतिक शेअरबाजारात अनिशिचतता बळावल्यानंतर परदेशी संस्थागत आणि इतर गुंतवणूकदारांनी आठवड्याच्या पातळीवर 430 कोटी रुपयाची विक्री केली हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे.
आगामी काळातही डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य अधिकच कमी झाल्यास परदेशातील संस्थागत गुंतवणूकदार आणखी विक्री वाढविण्याची शक्‍यता आहे. मात्र त्या अवस्थेत माहिती तंत्रज्ञान आणि औषधी या निर्यात करणाऱ्या क्षेत्रांना अधिक लाभ मिळू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)