नवी दिल्ली: आर्थिक वर्षं 2018 जूनच्या तिमाहीत विकासदर चांगलाच झेपावला आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत देशातील जीडीपीमध्ये तेजी आली असून, विकासदर 7.7 टक्‍क्‍यांवरून 8.2 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. आता हा विकास दरकमी होण्याची शक्‍यता कमी असल्याचे नीती आयागाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, या बाबत घेतल्या जात असलेल्या शंकाना काही आधार नाही. पुढील जून महिन्यापर्यंत कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी होण्याची शक्‍यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्पादन आणि कृषी क्षेत्रांमधल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक वेगळीच झळाळी मिळाली असून, ते आकडेवारीतून दिसून आले आहे. 2011-12 च्या आधारभूत किमतीच्या अंदाजानुसार 2018-19च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 33.74 लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)