आगामी काळात वाहन विक्रीबाबत कंपन्या आशावादी 

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून वाहन विक्री अपेक्षेइतकी झाली नसली तरी कार उत्पादन करणाऱ्या कंपन्या आगामी काळाबाबत आशावादी आहेत.

सध्या प्रवासी वाहन गटामध्ये मारुती सुझुकीचे पहिले स्थान कायम राहिले आहे. सप्टेंबरमध्ये पहिल्या दहा वाहनांमध्ये कंपनीची तब्बल सात वाहने राहिली आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्‍चर्स (सिआम)ने जाहीर केलेल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये मारुती सुझुकीची सात विविध प्रकारची वाहने पहिल्या दहामध्ये नोंदली गेली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दहापैकी उर्वरित तीन स्थानावर ह्युंदाई मोटर इंडियाची वाहने राहिली आहेत. मारुतीची स्विफ्ट 22,228 विक्रीसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर अल्टो दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र कंपनीची विक्री या महिन्यात वार्षिक तुलनेत काहीशी घसरली आहे. सेदान श्रेणीतील स्विफ्ट डिझायर तिसऱ्या स्थानी तर बलेनो चौथ्या स्थानी राहिली आहे. व्हिटारा ब्रेझा पाचव्या स्थानावर आहे. ह्युंदाई मोटर इंडियाची एलाईट आय20 सातव्या स्थानावर आहे, तर ग्रॅण्ड आय10 व क्रेटा या अनुक्रमे आठव्या व नवव्या स्थानावर राहिल्या आहेत. शेवटच्या स्थानावर मारुतीची सेलेरिओ हे हॅचबॅक श्रेणीतील वाहन राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)