आगामी काळात पर्यटन उद्योग फोफावणार 

मुंबई: पर्यटन उद्योग कमी गुंतवणुकीत जास्त रोजगार निर्माण करतो. त्याचबरोबर यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. या कारणामुळे केंद्र सरकार आणि विविध राज्य पर्यटनाला चालना देत आहेत. त्याचबरोबर खासगी क्षेत्रही यात पुढाकार घेत असल्यामुळे आगामी काळात पर्यटन उद्योग वाढणार असल्याचे ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर (टीटीएफ)चे व्यवस्थापकीय संचालक जी ईब्राहीम यांनी सांगीतले. ते म्हणाले की, अहमदाबाद आणि पुण्यानंतर मुंबईत टीटीएफ मुंबईमध्ये 5 ते 7 ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे. यात 17 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील व आठ देशांतील तब्बल 115 प्रदर्शक सहभागी होणार आहेत.
यामुळे ट्रॅव्हल ट्रेड आणि प्रवासी समोरासमोर भेटून संपर्क वाढवण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनात एकाच वेळेस राज्यस्तरीय पर्यटन मंडळे, राष्ट्रीय पर्यटन कार्यालये, हॉटेल व्यावसायिक, विमान कंपन्या, अशा सर्वांचा सहभाग असणार आहे. भारत, चीन, कोरिया आणि न्यूझीलंड आदी देशही सहभागी होत आहेत. याबरोबरच दुबई, नेपाळ, दक्षिण कोरिया आणि थायलंड आदी देशांचेही प्रतिनिधित्व असणार आहे. गुजरात, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशातील मोठ्या प्रमाणातील हॉटेलांसह आणि येथील एजंट प्रदेशांच्या वैशिष्ट्‌यांसह पुण्याच्या टीटीएफसाठी राज्यस्तरीय भागीदार म्हणून सहभागी होणार आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)