आगामी काळात डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर – प्रसाद

नवी दिल्ली – हिरो एंटरप्रायझेसच्या 12 बाराव्या माइंडमाईन दोन दिवसांच्या संमेलनाचे उद्‌घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले. या शिखर परिषदेचे उद्‌घाटन विधि आणि न्यायमंत्री व इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वर्षीच्या परिषदेचा विषय हा “भारत 75′ : हा नवीन भारत आहे का, असा आहे.परिषदेचे उद्‌घाटन करताना, रविशंकर प्रसाद म्हणाले की, प्रशासकीय सेवांचे डिजिटल वितरण आणि डिजिटल अर्थव्यवस्था ही डिजिटल भारतचे तत्त्व आहेत. तसेच पुढील 5 ते 7 वर्षांत भारताची 1 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता आहे. येत्या काळात भारत डेटा विश्‍लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या नवीन तंत्रज्ञानांसाठी केंद्र बनेल.

या कार्यक्रमात बोलताना हिरो एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील कांत मुंजाल म्हणाले की, भारतीय लोकांमध्ये एका विषयाबद्दल अनेक मते असतात. हेच आपल्याला एक अत्यंत संपन्न, गतिशील, लोकशाही देश बनवते. मला वाटते तंत्रज्ञान हे येत्या काळात भारताच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)