आगामी आठवड्यात गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता

मुंबई -जानेवारीपासून शेअरबाजार निर्देशांक बरेच घसरले आहेत. या काळात मुख्य निर्देशांकांपेक्षा छोट्या कंपन्यांचे स्मॉल कॅप आणि मिड कॅप जास्त घसरले असल्याचे दिसून येते. त्या अगोदर मोठ्या कंपन्यांपेक्षा छोट्या कंपन्यांचे निर्देशांक जास्त फुगले असल्याची ओरड होती.

2018 मध्ये आतापर्यंत स्मॉल कॅप 11.62 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. तर मिडकॅप 10.43 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. त्या तुलनेत मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 2018 मध्ये आतापर्यंत 3.19 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 32968 अंकांवर आहे. 29 जानेवारीला हा निर्देशांक 36443 अंकावर गेला होता. मात्र, नंतर बॅंकांतील घोटाळे आणि जागतिक व्यापारयुद्धामुळे निर्देशांक कमी झाले. त्याचबरोबर सरकारने दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर लावल्याचा परिणाम शेअरबाजारातील गुंतवणुकीवर झाला आहे.

जानेवारी महिन्यात सर्व काही आलबेल होते. त्या महिन्यात सेन्सेक्‍स 6.36 टक्‍क्‍यांनी वाढला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यात गळती सुरू झाली. फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्‍स 4.79 टक्‍क्‍यांनी तर मार्च महिन्यात 3.16 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. अशा अनिश्‍चिततेच्या काळात मोठ्या कंपन्यांपेक्षा छोट्या कंपन्यांवर अविश्‍वास दाखविला जातो.
कोटक सिक्‍युरीटीजचे उपाध्यक्ष संदीप चोरडिया यांनी सांगितले की, आता जागतिक आणि देशातील परिस्थिती फारच लवचिक झाली आहे. व्यापारयुद्ध आणि रोख्यावरील परतावा वाढला आहे. भारतात निवडणुका होणार आहेत.

कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशातील निवडणुकांचे जे निकाल लागतील ते गुंतवणूकदारांना प्रभावित करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता आहे. छोट्या कंपन्यात स्थानिक गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असतात तर मोठा आणि परदेशातील गुंतवणूकदार हे मोठ्या कंपन्यात गुंतवणूक करीत असतात. अनेक ब्रोकर्स आणि विश्‍लेषकांना वाटते की, या वर्षी शेअरबाजारातून नफा काढून घेण्याचे व्यवहार कमी होतील व निवडणूक गुंतवणूकीचे जास्त होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)