आगमनासाठी कापूरहोळ, नसरापूर बाजारपेठ सजल्या.

कापूरहोळ- अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी सर्व पातळ्यांवर जोरदार सुरू आहे. आपल्या लाडक्‍या बाप्पाचे धुमधडाक्‍यात स्वागत करण्यासाठी आबालवृद्धांची लगबग सुरू असल्याचे चित्र भोर, वेल्हा, खेड-शिवापूर परिसरात असल्याचं दिसून येत आहे. या ग्रामीण भागात गणेशमूर्तींच्या दरावर गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा बदल दिसत नाही.
भोर तालुक्‍यातील कापूरहोळ, नसरापूर भोर शहर, निगुडघर, सारोळा, चेलाडी, वेळू येथे तर वेल्हा तालुक्‍यात आंबवणे, विंझर, वेल्हा येथे आणि हवेली तालुक्‍यातील खेड-शिवापूर आणि कोंढणपूर भागातील बाजारपेठांत गणरायाच्या आकर्षक मूर्ती आल्या आहेत. या ठिकाणी भले मोठे गणपतीचे स्टॉल लागले असून, गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरोघरी गणपती बसविण्यासाठी आकर्षक देखावा उभारण्याच्या कामात नागरिक व्यस्त असल्याचं दिसत आहेत. काही जणांनी गणेश मूर्ती खरेदी केली आहे, तर काही जणांनी मूर्ती बुकिंग केल्याचे कापूरहोळमध्ये दिसून येते आहे. मागील काही महिन्यांपासून गणेशमूर्ती तयार करण्यात मूर्तिकार व्यस्त होते. रंगाच्या छटा, मोत्याच्या माळा आणि विविध रंगीबेरंगी अलंकार रचना करून मूर्ती बाजारात आल्या आहेत. 45 रुपयांपासून काही हजारांपर्यंत गणेश मूर्तींच्या किमती आहेत. या मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दीच सायंकाळी पाहावयास मिळत आहे.
गणेशमूर्तीबरोबर अन्य आकर्षक सजावटी साहित्याने देखील बाजारपेठ फुलून गेली आहे. फुलांची तोरणे, लाईटच्या माळा, सिंहासन, रंगीबेरंगी पेपर असे बरचसे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. प्लॅस्टिक बंदी असल्याने प्लॅस्टिकचे साहित्य बाजारात पाहण्यास मिळत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)