खेड – कर्जत तालुक्यातील आखोणी येथील रामदास रघुनाथ सायकर यांच्या दुचाकीची पुणेजिल्ह्यातील भिगवण येथून चोरी झाली. रविवारी रात्री हा चोरीचा प्रकार घडला. भिगवण येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सायकर यांनी मोटारसायकल उभी केलेली होती. उत्तम विहार येथून घराच्या संरक्षण भिंतीचेगेट उघडून भामट्यांनी शाईन (क्रमांक एमएच 42 – एस – 8063) ही मोटारसायकल पळवली. भिगवण येथून यापूर्वीही दुचाकी चोरीचेप्रकार घडले आहेत. या प्रकाराने परिसरातील नागरिक वैतागले आहेत. भिगवण पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार देण्यात आली. पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0