आखरवाडीच्या उपसरपंचपदी शोभाताई मुळूक बिनविरोध

राजगुरूनगर-आखरवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभाताई अरुण मुळूक यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.
सदस्यांच्या एकविचारातून ठरल्यानुसार प्रतीक्षा रासकर यांनी त्याच्या उपसरपंच पदाचा राजीनामा नुकताच दिला होता. या रिक्त पदासाठी सरपंच रितेश मुळूक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात नुकतीच विशेष सभा झाली. या सभेत उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी शोभाताई अरुण मुळूक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध उपसरपंचपदी निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ मुळूक, कविता गिलबिले, बंबन मुळूक, प्रतीक्षा रासकर, संगीता मुळूक, वैशाली मुळूक, रामदास शिंदे, गणेश मुळूक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शोभाताई मुळूक यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खेड बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. अतुल घुमटकर, ऍड. अरुण मुळूक, ऍड. बाळासाहेब लिंभोरे, ऍड. सुखदेव पानसरे, ऍड. अतुल गोरडे, ऍड. सुभाष कड, ऍड. आदिनाथ कड, ऍड. माणिक वायाळ, ऍड. बिभीषण पडवळ, ऍड. राजेश कुलकर्णी, हवेली तालुक्‍याचे मनसेचे सरचिटणीस चंदन कड, प्रभाकर कड, रोहिदास मांजरे, माजी सरपंच गणपत मुळूक, गोविंद मुळूक शेखर थिगळे, खेड पंचायत समितीचे सदस्य मच्छिंद्र गावडे, माजी सरपंच शिवाजी जाधव, ऍड. दत्तात्रय लिंभोरे, ऍड. अजय पडवळ, काशिनाथ मुळूक, कुशाभाऊ मुळूक आदी उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच शोभाताई मुळूक यांनी सांगितले की, गावाच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य यांच्याबरोबर विकास कामे आणण्यासाठी प्रयत्न करू. गावातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)