आक्षेपार्ह संदेश टाकल्यास कडक कारवाई : जिल्हाधिकारी

????????????????????????????????????

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) – समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह संदेश वितरीत होणार नाहीत याबद्दल सर्वांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. आक्षेपार्ह संदेश टाकल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल, अशा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला.

येथील अलंकार सभागृहात शांतता समितीची बैठक आज घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, मुख्याधिकारी शंकर गोरे आदी उपस्थित होते.
श्रीमती श्‍वेता सिंघल म्हणाल्या, पोलीस विभागाच्या सायबर सेलच्या माध्यमातून समाज माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कुणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. शांतता कमिटीमध्ये नागरिकांनी विकासाचे प्रश्न विचारलेही चांगली बाब आहे. स्वच्छतेबाबत, अतिक्रमणाबाबत तसेच शहरातील वाहतुकीबाबत लवकरच बैठक घेतली जाईल. शाळा, महाविद्यालये सुरू होतील. त्याचा वाहतुकीवर आणखी ताण पडणार आहे. शहरातील वाहतुकीसंदर्भात बैठक घेवून वाहतूक सुरळीत केली जाईल. गावा-गावतील तंटामुक्त गाव समितीचे पुनर्गठन करा. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावागावांमध्ये आता एकोपा निर्माण झाला आहे. तंटामुक्त गाव समितीचे पोलीस विभागाने त्वरीत पुर्णगठन करावे तसेच पोलीसमित्रांची नियुक्ती करा. समाज माध्यमांवर कुणी आक्षेपार्ह मजकुर टाणार नाही याची जनजागृती करा, असे आवाहनही श्रीमती सिंघल यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संदीप पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये जातीय, धार्मिक तणाव कधी झालेला दिसला नाही. येथील सामाजिक ऐक्‍याचे उदाहरण इतरांना देण्यासारखे आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती नेमलेली आहे. स्वच्छ व सुंदर सातारा बनविण्यासाठी येत्या काही काळात शहरातील अतिक्रमणे काढले जातील. चालण्याचे फुटपाथवरील अतिक्रमणे काढले जातील. प्रत्येक वॉर्डात पोलीस मित्रांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये जास्ती जास्त तरुणांचा समावेश असेल. समाज माध्यमांचा गैरवापर वाढला असून समाजमाध्यमांवर कुणी आक्षेपार्ह समजुकर टाकल्यास त्याच्यावर गुन्हा नोंद केला जाईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

माधवी कदम म्हणाल्या, शहरातील नागरिक शांततेबाबत जागृत आहेत. येथे प्रत्येक सण हा शांततेत साजरा करतात. ग्रेडसेपरेटच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पोलीस विभागाच्या मदतीने वाहतूक व्यवस्था आता सुरळीत करण्यात आली असून नागरिकांनीही सहकार्य करावे.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)