आक्रोश आंदोलनास परिट समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांचे पत्रकाद्वारे आवाहन

कराड – मुंबई येथे मंगळवार, दि. 8 जानेवारीला होणाऱ्या आक्रोश आंदोलनाबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून या आक्रोश आंदोलनास सातारा जिल्ह्यातील परिट समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. डी. एम. भांडे समितीचा अहवाल राज्य शिफारशीसह केंद्र शासनाला पाठवावा तसेच सोबत जोडलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीचा अहवाल रद्द करावा, श्री संत गाडगेबाबा महाराज यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, 23 फेब्रुवारी हा संत गाडगेबाबा महाराज यांचा जन्मदिवस स्वच्छता दिन म्हणून राज्य सरकारने घोषित करावा आदी मागण्या आहेत. या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात. यासाठी दि. 8 जानेवारी 2019 रोजी मुंबईत येथील आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन केले जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

या आंदोलनास राज्यातील परिट समाजातील सर्व बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत. या आरक्षण लढ्यास प्रामुख्याने आरक्षण मिती प्रमुख रमाकांतशेठ कदम, ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथ बोरसे, अध्यक्ष डी. डी. सोनटक्के, कार्याध्यक्ष राजेंद्र खैरनार, महासचिव अनिल शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक किसनराव जोर्वेकर, वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष राजाराम रसाळ, बबनराव शिंदे, प्रतापराव शेडगे, डिगंबर यादव, संजय गायकवाड, सुनिल नेमाडे, जगदिश चन्ने, तानाजीराव पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या आक्रोश आंदोलनास सातारा जिल्हा आघाडीवर राहील. यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्‍यक आहेत. सातारा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त परिट बांधवांनी आपला सहभाग नोंदवावा. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी पत्रकात केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)