आक्रमक आदिवासींच्या बेटावर

सध्याच्या आधुनिक युगात माणूस घरबसल्या दूरवरच्या देशातील माणसाला पाहू शकतो व त्याच्याशी बोलू शकतो. माणूस चंद्रावरही जाऊन पोहोचलेला आहे. मात्र, अशा काळातही रानावनातील कंदमुळे, पशुपक्षी खाणारे आणि धनुष्यबाण घेऊन शिकार, संरक्षण करणारे लोकही अस्तित्वात आहेत. अमेझॉनपासून बोर्नियापर्यंत अनेक जंगलांमध्ये अशा आदिवासी जमाती आहेत. भारताच्या अधिकारक्षेत्रातील अंदमानच्या सेंटिनलीज नावाच्या एका बेटावरही अशीच एक आदिवासी जमात आहे. हे लोक अत्यंत आक्रमक आहेत. ते कुणालाही या बेटावर येऊ देत नाहीत. क्वचित कुणी तिथे आले तर तत्काळ मारून टाकतात!

या बेटावरील आदिवासींचा आधुनिक समाजाशी कोणताही संबंध नाही. त्यांना आधुनिक जगाशी जोडण्याचे काही प्रयत्न करून पाहण्यात आले होते, पण त्यांची अत्यंत आक्रमक आणि क्रूर प्रवृत्तीमुळे ते शक्‍य झाले नाही. काही मोजक्‍या लोकांनी त्यांच्या बेटावर उतरण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना जीव गमवावा लागला. तुरूंगातून पळून गेलेला एक कैदी या बेटावर गेला असता त्यालाही आदिवासींनी ठार केले.

1981 मध्ये एक भरकटलेले जहाज या बेटाजवळ जाऊन पोहोचले. त्यावेळी किनाऱ्यावर अनेक आदिवासी हातात धनुष्य आणि विष लावलेले बाण घेऊन सज्ज होते. 2004 मध्ये भूकंप आणि त्सुनामीनंतर भारत सरकारने या बेटाची पाहणी करण्यासाठी लष्करातील एक हेलिकॉप्टर पाठवले. मात्र, या लोकांनी हेलिकॉप्टरचाही धनुष्यबाण घेऊन पाठलाग सुरू केला! या बेटावर गर्द जंगल असून हे आदिवासी फळे, कंदमुळे आणि शिकारीवरच आपला उदरनिर्वाह करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)