आकुर्डी, पिंपरीतील “आवास’चा मार्ग मोकळा

पिंपरी – महापालिकेचा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आकुर्डी, पिंपरी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घरांसाठी निविदा प्रक्रियेतील “स्पेसिफिकेशन’मध्ये फेरबदल करून निविदा मागविल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांसाठी 84 कोटी 32 लाख रुपये लघुत्तम दर सादर केलेल्या एकाच ठेकेदाराला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारमार्फत सर्वांसाठी घरे – 2022 या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना अभियान राबविण्यात येत आहे. महापालिका मंजूर विकास आराखड्यात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठी जागांची आरक्षणे आहेत. या जागा ताब्यात आल्यानंतर त्याठिकाणी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आकुर्डी येथील आरक्षण क्रमांक 283 येथील बेघरांसाठी घरे (एचडीएच) या आरक्षित जागेवर आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) 568 घरे बांधण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) केंद्र सरकारच्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने 7 फेब्रुवारी 2018 रोजी मान्यता दिली. त्यानुसार, महापालिकेने या कामांसाठी निविदा मागविल्या. सुरुवातीला बांधकामाचा अंदाजित खर्च 54 कोटी 80 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरीतील आरक्षण क्रमांक 77 येथील घरांसाठी 15 जून 2018 रोजी निविदा मागविण्यात आल्या. या बांधकामाचा अंदाजित खर्च 35 कोटी 68 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला मात्र, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत निविदा प्रक्रियेतील राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे आकुर्डी, पिंपरी येथील 90 कोटी 48 लाख रुपयांच्या कामांच्या फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदेतील स्पेसिफिकेशनमध्ये फेरबदल केल्याने हा खर्च 86 कोटी 41 लाखांवर आला. नटवर कन्स्ट्रक्‍शन यांनी सादर केलेला दर एसएसआर 2017-18 नुसार निविदा स्वीकृत दरापेक्षा अनुक्रमे 6.18 टक्के आणि 7.62 टक्‍क्‍याने कमी आहे. त्यानुसार, नटवर कन्स्ट्रक्‍शन यांच्यामार्फत दोन्ही प्रकल्पांसाठी सादर केलेला 84 कोटी 32 लाख रुपये दर अधिक रॉयल्टी आणि मटेरियल टेस्टींग चार्जेससह काम करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

9 हजार 458 सदनिकांचे नियोजन
शहराच्या विविध भागात 10 ठिकाणी 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार चऱ्होली येथे 1442, रावेतमध्ये 934, डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशी – बोऱ्हाडेवाडीमध्ये 1288, वडमुखवाडीत 1400, चिखलीमध्ये 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेच्या प्रकल्प अहवालास (डीपीआर) केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)