आकुर्डीत विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन

पिंपरी – समरसता साहित्य परिषदेतर्फे 3 जानेवारी रोजी दहावे एक दिवसीय विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट सांस्कृतिक भवनात हे संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेआठ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष शरदराव कुंटे, आनंदवन भूजल-शाश्‍वत सहयोगचे भास्कर गोखले, प्रतिभा महाविद्यालयाचे विश्‍वस्त डॉ. राजेंद्र कांकरिया आदी उपस्थित असणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संमेलनाच्या पहिल्या सत्रात जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मीना पोकरणा यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी तोफखाने (ग. दि. माडगूळकर), प्रदीप गांधलीकर (पु. ल. देशपांडे) आणि पद्माकर पाठक (सुधीर फडके) हे या तीन दिग्गजांची व्यक्‍तिमत्त्वे उलगडून सांगतील. दुसऱ्या सत्रात राजेंद्र घावटे संचलित प्रश्‍नमंजुषा या सामान्यज्ञानावर आधारित कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होतील.

संमेलनाच्या प्रत्येक सत्रात पिंपरी-चिंचवड शहरातील तेरा महाविद्यालयांचे निवडक विद्यार्थी पथनाट्य सादर करतील. समरसता साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रांताध्यक्षा डॉ. श्‍यामा घोणसे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघ चालक डॉ. गिरीश आफळे तसेच नॉव्हेल शैक्षणिक समूहाचे संस्थापक अमित गोरखे यांची प्रमुख उपस्थिती असेल. विनाशुल्क असलेल्या या एक दिवसीय संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन समरसता साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्षा शोभा जोशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)