आकुर्डीतील दोन उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

पिंपरी – प्राधिकरणाने आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रात, तसेच पेठ क्रमांक 26 येथे विकसित केलेली उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

आकुर्डीतील सुमारे पावणे दोन एकरावरील उद्यानात विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आली आहेत. रोप क्राऊलर, बॅलसिंग ब्रिज, रोप वॉक, जंपर्स अशा प्रकारच्या खेळण्यांचा त्यात समावेश आहे. ऍडव्हेंचर पार्कच्या धर्तीवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार जंपर्समध्ये मुलांना उंच उड्या मारता येतील. रोप वॉकमध्ये लोखंडी अँगलला दोरखंड अडकवून जमिनीपासून अँगलपर्यंत चढता येईल. तसेच हर्डल वॉकचीही (टप्प्याटप्प्याने उंच होत जाणारे आडवे लोखंडी अँगल) सोय करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या व्यतिरिक्त क्‍लाइंबिंग वॉल, 400 मीटरचा जॉगिंग ट्रॅकही आहे. उद्यानात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला, पुरुष यांच्यासाठी आधुनिक प्रकारची प्रत्येकी दोन शौचालये बांधण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी गजिबोची सोय आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी चार लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

पेठ क्रमांक 26 मधील वास्तुरचना महाविद्यालयाजवळील 30 गुंठे जागेवर विकसित करण्यात आलेल्या उद्यानामध्ये 155 मीटरचा जॉगिंग ट्रॅक करण्यात आला आहे. विविध प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात आलेली आहेत. मध्यभागी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वर्तुळाकार कक्ष उभारण्यात आला आहे. त्याजवळच मुलांना खेळण्यासाठी चौकोनी हौद आहे. मुलांना खेळताना इजा होऊ नये, यासाठी त्यामध्ये वाळू पसरण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 83 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)