पिंपरी – चिंचवड पोलिसांनी आकाश लांडगे या तरुणाच्या खूनातील एका सराईत आरोपीला उस्मानाबाद येथील भूम तालूक्‍यातून अटक केले आहे.

रणजीत बापू चव्हाण (वय-23 रा.वेताळनगर झोपडपट्टी चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव असून तो गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश लांडगे याचा खून केल्यापासून चव्हाण हा फरार होता. यावेळी तो उस्मानाबाद येथील भूम तालूक्‍यात लपून बसल्याचे पोलिसांना खबर मिळाली यावेळी चिंचवडच्या तपासी पथकाने सापळा रचून त्याला अटक केले.त्याच्यावर चिंचवड,निगडी, वाकड, वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील पाच गंभीर गुन्हयात फरार होता. तसेच विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर मारहाण करणे, जाणूनबुजून दुखापत करणे असे एकूण 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आकाश तानाजी लांडगे (वय 24, पागेची तालीम, चिंचवडगाव)याचा 29 मे रोजी जुन्या वादातून रात्री सव्वा अकरा वाजता कोयत्याने वार करत डोक्‍यात कुंडी घालून निरघृण खून केला होता. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात रणजित बाबू चव्हाण व स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे (वय 23, रा भोई आळी, चिंचवडगाव), प्रफुल्ल ढाकणे, सोन्या वराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,सहायकपोलीस आयुक्त सतिश पाटील, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोहवा पांडुरंग जगताप, पोलीस नाईक आखाडे, शेलार, शिरसाठ, यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)