आकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले

हुबळी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या विमान घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी काल दिल्लीहून विमानाने हुबळी येथे गेले होते.

दरम्यान, विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने ते हवेतच हेलकावे घेऊ लागले. या प्रकरणी संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विमानातूनच प्रवास करणारे कौशल विद्यार्थी यांनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसनेही याबाबत कर्नाटक पोलिसांकडे आणि नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) तक्रार केली असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर लॅण्ड करताना वातावरणही स्वच्छ होतं. त्यामुळे विमान अचानक हेलकावे का घेऊ लागलं? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)