आकाशवाणीच्या माध्यमातून उत्कृष्ठ कलाकारांना संधी

सातारा ः यशस्वी स्पर्धकांसमवेत शिरीष चिटणीस बाळासाहेब चव्हाण, भानुदास गायकवाड, महेश सोनावणे आदी मान्यवर.

इंद्रजित बागल:रिदमची नृत्य,लोकसंगीत व चित्रकला स्पर्धा संपन्न
सातारा, दि. 19 (प्रतिनिधी) – नृत्य, लोकसंगीत व चित्रकला अशा स्पर्धेमधून नवीन कलाकार जन्माला येतात पण योग्य व्यासपीठ न मिळाल्याने कलेला चालना मिळत नाही. भावी आयुष्यामध्ये उत्कृष्ठ कलाकार घडविण्यासाठी आकाशवाणीच्या माध्यमातून संधी देऊ असे मत आकाशवानी केंद्र सांगली व कोल्हापूरचे केंद्रप्रमुख इंद्रजीत बागल यांनी व्यक्त केले. तसेच दंगा करणारी मुलेही हुशार असतात फक्त योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती आयुष्यात यशस्वी होतात असे मत शिरीष चिटणीस यांनी व्यक्त केले.
रिदम्‌ कला व साहित्य अकादमी सातारा व पुणे, महालक्ष्मी सह. पतसंस्था सातारा व कलाध्यापक संघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कलेला चालना मिळण्यासाठी नृत्य, लोकसंगीत व चित्रकला स्पर्धा नुकतीच महालक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्‌घाटन स्पर्धेचे सर्व परीक्षक संगीत विशारद बाळासाहेब चव्हाण, शाहिर भानुदास गायकवाड, अध्यक्ष महेश सोनावणे, आर्टिस्ट अनिता सोनावणे, आर्टिस्ट किशोर कुदळे, ज्येष्ठ शिक्षिका शिला जोशी यांच्या हस्ते नटराज मुर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे आकाशवाणी केंद्र सांगली व कोल्हापूरचे केंद्रप्रमुख इंद्रजित बागल व सुप्रिया बागल तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, अखिल भारतीय चंद्रसेनीस कायस्थ प्रभु समाजाचे संचालक प्रकाश देशपांडे, मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट किशोर कोतवाल, रिदम्‌ कला व साहित्य अकादमी साताराचे अध्यक्ष महेश सोनावणे, आदर्श महिला अधिकारी पुरस्कार विजेत्या प्राचार्या स्वरूपा पोरे उपस्थित होते. सार्व पाहुण्यांचे स्वागत सन्मानचिन्ह व रोप देऊन महेश सोनावणे व अनिता सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जास्त करून सामाजिक जनजागृती करणारे विषयांची निवड केली. यामध्ये दहशतवाद, एअर स्ट्राईक, 26/11 हमला, सेव्ह गर्ल, सेव्ह ट्री या विषयांवर चित्रे व नृत्य सादर केली. लहान गटापासून ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. नृत्य स्पर्धेमधील सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक सिध्दी इंग्लिश मीडियम स्कूल शेतकरी नृत्य, व्दितीय क्रमांक सिध्दी इंग्लिश मीडियम स्कूल बेटी बचाओ नृत्य, तृतीय क्रमांक लोकमंगल हायस्कूल शाहुपूरी. लोकसंगीतमध्ये प्रथम क्रमांक शर्वरी काशीद तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांची पुणे येथील चित्रप्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. व सर्वांना मेडल व प्रमानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये लहान गट प्रथम क्रमांक वरद क्षीरसागर, व्दितीय क्रमांक प्रेरणा कांबळे, तृतीय क्रमांक नील पवार. मोठा गट प्रथम क्रमांक कादंबरी गालिंदे, व्दितीय क्रमांक आर्यन गुजर, तृतीय क्रमांक आदित्य इंगळे व उत्तेजनार्थ यश सुर्यवंशी.
खुला गट- प्रथम क्रमांक एकांक नलवडे, व्दितीय क्रमांक वैष्णवी जाधव यांनी पटकावला. यावेळी उत्कृष्ठ नृत्यासाठी प्रतिक्षा जाधव, कादंबरी गालिंदे, आरती भोसले, वैष्णवी माने, अनिष्का देशमुख, आकांक्षा देशमुख, गार्गी दिवशीकर, गौरवी जाधव यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नेहरू युवा केंद्रा खंडाळ्याची आनंद गुळूमकर रेस्क्‍यु टीम यांचा महामार्गांवरील अपघातग्रस्तांना निःशुल्क मदत कार्याबद्दल तर नेहरू युवा केंद्र फलटनचे दत्ता यादव यांच्या ग्रुपचा सामाजिक कार्यासाठी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा जिल्ह्यातील सैदापूर येथील मचिंछद्र पाटील, भुषण पाटील, प्रभावती पाटील तर कराड तालुक्‍यातील शुभम साबळे, मयुरी भोसले यांचा मुंबई येथिल ओरिसा व महाराष्ट्राच्या युथ एक्‍सचेंज प्रोग्राममधील उत्कृष्ठ कार्यासाठी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीपतराव पाटील हायस्कूलचे कला शिक्षक किशोर कुदळे यांनी इंद्रजित बागल व सुप्रिया बागल यांचे काही मिनिटांमध्ये स्केच काढून सर्वांना अचंबित केले. सूत्रसंचालन विद्या दिवशीकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)