आकस्मिक घटना घडल्यास सभासदाचे 10 लाख कर्ज माफ

सासवड-पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभा आचार्य अत्रे सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी वार्षिक सभेत नफा वाटणीस मंजूरी देताना नवीन सुधारित पोटनियमांस सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. तसेच सभासद कर्जसंरक्षण निधीत वाढ करण्याच्या कार्यकारी मंडळाने घेतलेल्या ठरावास एकमताने मान्यता दिली. यामुळे कर्ज संरक्षण निधीत वाढ होण्याबरोबरच सभासदांचे आकस्मिक घटना घडल्यास कमाल 10 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सभेत घेण्यात आला, अशी माहिती सभापती बाळासाहेब फडतरे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरूवात स्वरसाधना संगीत मंचाच्या सुमधूर ईशस्तवनाने झाली. प्रथम सत्रात सेवानिवृत्त, गुणवंत शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय, डॉक्‍टरेट परीक्षेतील गुणवंताचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यशिक्षक नेते नाना जोशी, महादेव माळवदकर, अरूण महाडिक, तानाजी फडतरे, सुनील कुंजीर, राजेंद्र जगताप, गोरख मेमाणे, रोहिदास कोलते, अनिल कांबळे, दत्ता गायकवाड, श्रीधर वाघोले, आप्पा भिसे, उपसभापती रजनी पापळ, सचिव वंसत कामथे, संचालक राजेंद्र कुंजीर, संदीप जगताप, सुनील लोणकर, सुनिल कांबळे, रवींद्र जाधव, प्रदीप कुंजीर, अलका रासकर, सतिश कुंजीर, यशवंत दगडे, गणेश कामठे, बाळा साहेब कुंजीर, अविराज शिंदे, सुरेश जाधव, विजय गायकवाड, सुरेश जगताप, धनाजी साबळे, सुनील पवार, लतिफ इनामदार, शागृधर कुंभार तसेच सभासद, गुणवंत शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्ता काळे, रमेश जाधव यांनी आपले विचार व्यक्‍त केले. सूत्रसंचालन वसंत कामथे, गणेश कामठे यांनी केले. तर रजनी पापळ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)