आकलन वाढविण्यासाठी वाचन महत्त्वाचे… (भाग दोन)

उजळणीसाठी वाचन – हे वाचन सावकाश करावे. मुलाला ज्या घटकाचा अभ्यास करावयाचा आहे, त्या घटकाचे निरनिराळ्या प्रश्‍नांत रुपांतर करण्यास सांगा. प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी वाचन केल्यास वाचन अर्थपूर्ण होते व वाचनाची गोडी निर्माण होते. वाचताना लेखकाला काय म्हणायचे आहे हे समजून घ्या. आपल्याला काय समजले आहे यासाठी स्वत:लाच प्रश्‍न विचारा. या उपघटकात काय नवीन आहे. आपले पूर्वज्ञान व नवीन माहिती यांचा काय संबंध आहे, घटकातील कोणते शब्द नवीन आहेत, ते पहा.

नवीन शब्दाचा अर्थ समजून घ्या – प्रत्येक परिच्छेदातील महत्त्वाचा मुद्दा शोधण्याचा प्रयत्न करा. ठळक शब्द नीट समजून घ्या. वाचन पूर्ण झाल्यावर काही वेळ शांत बसा, काय वाचले, कितपत समजले, प्रश्‍नाचे उत्तर सापडले का? याचा विचार करा व नंतर पुन्हा एकदा वाचन करा, म्हणजे पाठ्यपुस्तकांची उजळणी पूर्ण झाली असे समजतात. आपला आत्मविश्‍वास वाढतो.

वाचन वेग-पालकांनी काय करावे?

मुलांना बारा ओळीचा उतारा नेहमीच्या पध्दतीने वाचायला सांगा. आपल्या जवळ सेकंद काटा असलेले घड्याळ ठेवा. उतारा किंवा परिच्छेद वाचण्यास मुलाला किती सेकंद लागले ते पहा.आपल्या मुलाचा वाचनाचा वेग पुढील कोष्टकाशी पडताळून पहा.30 पेक्षा कमी सेकंद : फार जास्त वेग. 31 ते 45 सेकंद : समाधानकारक वेग. 46 ते 60 सेकंद : सामान्य वेग. 61 ते 75 सेकंद : हळू वेग.75 पेक्षा जास्त सेकंद : खूपच हळू वेग

  वाचन पध्दतीचे निकष…

एकाचवेळी एक शब्द वाचण्याऐवजी शब्दसमूह वाचावा. प्रत्येक पानावरुन प्रत्येक शब्दावरुन चटकन नजर फिरवा. एखादी ओळ वाचल्यानंतर मध्येच परत मागे जाऊन वाचू नये. वाचन पूर्ण झाल्यावर आवश्‍यक वाटल्यास पुन्हा संपूर्ण वाचन करा. एकाग्रतेने वाचन करा. चित्र, तक्‍ते, आलेख, आकृती, नकाशा वाचनाचे निकष मुलांनी शिक्षकांकडून समजून घेऊन त्याप्रमाणे या भागाचे वाचन करावे. वाचन कौशल्य मुलांना परिक्षेपुरतेच महत्त्वाचे नाही, तर ते आयुष्यभर जीवन व्यवहाराचे कौशल्य म्हणून उपयोगी पडणार असल्याचे पालकांनी लक्षात घ्यावे.

  – मीना जाधव 
नालेगाव,मो. 9403943736


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)