आकर्षक मानेसाठी काय कराल?

      सुजाता टिकेकर

निसर्गाने कितीही सौंदर्य दिलेले असले आणि त्यात तुमची मान जर कुरूप असेल तर तुमच्या सौंदर्याला कुठंतरी गालबोट लागलं आहे असे वाटेल. म्हणून सुंदर सुरईदार मळरहित आणि मुलायम मानेसाठी काही उपाय…

स्नानाच्या वेळी केस डोक्‍यावर बांधा व मऊ बॉडी स्क्रबने मान स्वच्छ करा.

दररोज चेहरा स्वच्छ करताना निरशा दुधाने वा क्‍लीजिंग मिल्कने मान स्वच्छ करा.

दर दोन दिवसांनी चमचाभर बेसन, थोडीशी हळद, चमचाभर कच्चे दूध व लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र मिसळून पेस्ट तयार करून मानेला लावावी व 15 मिनिटांनी धुवावी.

जर मान जास्त काळी असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी चमचाभर मुलतानी माती, चमचाभर दही व लिंबाचा रस एकत्र करून मानेवर 15 मिनिटे ठेवावा व नंतर धुऊन टाकावा.

उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन वा क्रीम मानेवर लावा.

एक चमचा मुलतानी माती, एक चमचा चंदन पावडर, चिमूटभर हळद व चमचाभर दूध एकत्र मिसळून पेस्ट बनवून मानेला 15 मिनिटे लावून ठेवा व नंतर धुऊन टाका.

दररोज 2 ते 3 मिनिटे मानेची कमनीयता व लवचीकता वाढविण्याचा व्यायाम केल्यास काही महिन्यातच अपेक्षित परिणाम स्पष्ट दिसू लागतो.

मान प्रथम उजवीकडे वळवा नंतर डावीकडे वळवा. असे रोज 15 ते 20 वेळा करा. यामुळे मानेचा लवचीकपणा वाढतो.

सरळ उभे राहून दीर्घ श्‍वास घ्या व मान वर उंच उचला व हळूहळू श्‍वास सोडत मान खाली आणा.

जर आपली मान व चेहरा छोटा असेल तर व्ही आकाराच्या गळ्याचा पोशाख घाला व त्यावर लांब पातळ चेन घाला. यामुळे मान लांब दिसेल.

लंबगोल चेहरा व सडपातळ मानेवर चौकोनी गळ्याचा वा कॉलर मुडपलेल्या गळ्याचा पोशाख घालावा. यावर गोल मण्यांची माळ खुलून दिसते.

चौकोनी चेहरा व मध्यम आकाराचा गळा यावर यू आकाराच्या गळ्याचा पोशाख खुलतो. यावर राणीहार वा मोत्यांची माळ शोभून दिसते.

आकर्षक मानेसाठी मसाज 

आपली मान अनेक कारणाने दुखू शकते. नेहमी वाचन करणे, सारखे लिखाण करणे या गोष्टींमुळे मानेच्या स्नायूंवर ताण पडून मानेच्या मणक्‍यांना कडकपणा येतो. तक्‍या जरी मानेखाली घेतला किंवा उंच उशी घेऊन झोपल्याने मानेच्या बाजूचे स्नायू कडक होतात. कधी कधी मणक्‍यातले अंतर वाढून मागच्या बाजूला डोके दुखते. एखाद्या वेळेला चक्‍कर सुद्धा येते. कोणत्याही अवस्थेत झोपताना त्रास होतो. उजव्या किंवा डाव्या हाताच्या बोटापर्यंत मुंग्या येतात.

खूप सूज येत असल्यास ती कमी करण्यासाठी निलगिरी तेल किंवा टर्पेंटाईन चोळून मिठाच्या गरम पाण्याने शेकावे. दिवसभरात 2 ते 3 वेळा शेकल्यास सूज कमी होते. मानेच्या तिसऱ्या मणक्‍यांत कठीणपणा जाणवत असल्यास दोन्ही हातांनी बोटांनी कंपन पद्धतीचा गोलाकार मसाज करावा लागतो. पाचव्या व सहाव्या मणक्‍यातील अंतर कमी असेल तर कौशल्यपूर्ण बोटे ताणून तीन बोटांनी हलकासा दाब पद्धतीचा मसाज करावा. त्यामुळे कडकपणा कमी होऊन मानेच्या हालचाली परत सुलभ रितीने होऊ लागतात. मानेखाली ठेवता येईल अशा कोणत्याही लहान डब्याला कापड गुंडाळून तो मानेखाली धरल्यास मानेला आलेला ताण बराचसा कमी होऊन दुखणे कमी होते. रोज झोपताना डोक्‍याखाली पांघरुणाची घडी घ्यावी अथवा मऊ कमी जाड असलेली उशी घ्यावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)