आकर्षक परताव्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची 50 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघांचा अटकपूर्व फेटाळला

पुणे- क्‍यु नेट कंपनीचे बिझनेसद्वारे कोट्याधीश होण्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची 50 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात दोघांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एम.एन.सलीम यांनी हा आदेश दिला आहे.
अखिल आगटे आणि खुशाल सेठ अशी अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात प्रितम दिलीप पठणकर, नीलेश दिलीप पैठणकर, भरत शर्मा आणि पंकज कोटेचा या चौघांवरही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. याबाबत पराग सतीश कर्वे (वय 38, रा. नऱ्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शहरातील वेगवेगळ्या भागात घडली. सर्व गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींनी फिर्यादी, त्यांचे मित्र, नातेवाईकांना क्‍यु नेट कंपनीचे बिझनेसद्वारे कोट्यावधी बनण्याचे अमिष दाखविले. बिझनेस पटला नाही, तर केव्हाही बंद करता येईल. ज्यावेळी बंद कराल, त्यावेळी बॅंकेपेक्षा दोन टक्के जास्त व्याजाने पैसे परत देण्याचे अमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडले. त्यानंतर पैसे न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात अखिल आणि खुशाल या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी विरोध केला. गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून व्यवहार करण्यात आले. पैसे परत मागितल्यानंतर गुंतवणूकदारांच्या कोऱ्या नोटराईज पेपरवर सह्या घेतल्या. मात्र, पैसे परत देण्यात आलेले नाहीत. ही गंभीर बाब आहे. गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी दोघांना अटक करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांचा अटकपूर्व फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. खान यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)