आई-वडील प्रत्येक विद्यार्थ्याचे विद्यापीठ

आळंदी- आई वडील हे प्रत्येक विद्यार्थ्याचे चालते बोलते विद्यापीठ आहे. आपल्या जीवनात त्यांच्या पेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही. आपला आदर्श हे आपले आईवडिलच असतात, म्हणून दररोज आई वडिलांचे दर्शन घ्या. आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्या शिवाय कोणत्याही कार्याला सुरुवात करू नका, असे प्रतिपादन मधुर व्याख्यानी जैन साध्वी जागृती महाराजसाब यांनी केले.
श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची प्रशालेत गुरुवारी (दि. 22) मधुर व्याख्यानी जैन साध्वी जागृती महाराजसाब यांचे मानवी जीवनातील आई-वडिलांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद यादव, पर्यवेक्षक सिद्धनाथ चव्हाण, दीपक मुंगसे, सूर्यकांत मुंगसे, किसनसिंग राठोड, शिक्षक प्रतिनिधी प्रकाश भागवत, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मधुर व्याख्यानी जैन साध्वी जागृती महाराजसाब यांनी आपल्या अमृत वाणीत मानवी जीवनातील आई-वडिलांचे महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई, वडिलांना देवासमान माना. आपल्यावर आई वडिलांनी केलेल्या संस्कारांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान द्या. तुम्ही जीवनात खूप मोठे झाला तरी आई-वडिलांपासून वेगळे होऊ नका. व्याख्यानाच्या शेवटी आई विषयीची एक कविता सादर करून उपस्थितांच्या मनात आई वडिलांविषयी असलेला आदर अधिक उंचावला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश मठपती यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)