आई-वडिलांना आर्थिक मदतीचे मार्ग (भाग-1)

तुमचे आईवडिल स्वतंत्र आणि स्वावलंबी आयुष्य जगत असतील आणि तुम्हांला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर तुमच्या बजेटवर ताण न येता आणि तुमच्या आर्थिक नियोजनाला धक्का न लावता तुम्ही त्यांना कशा प्रकारे सहाय्य करू शकता याविषयी…

तुमच्या आर्थिक मर्यादा जाणून घ्या – आई-वडिलांना सहाय्य केले पाहिजे असे तुम्हांला मनापासून वाटत असते. ते तुमचे कर्तव्य आहे, असे तुम्ही मानत असता. फक्त तुमची आर्थिक घडी रूळावर नसेल म्हणून तुम्ही कदाचित त्यांना मदत करू शकत नाही. आई-वडिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडील दोन गोष्टींना हात लावता कामा नये. पहिली म्हणजे तातडीचा निधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी जमवत असलेली पुंजी. तातडीच्या प्रसंगासाठीचा निधी बाजूला ठेवत असताना तुम्ही त्यामध्ये आई-वडिलांचाही समावेश करू शकता. सध्याची पिढी ही सँडविच जनरेशन मानली जाते. आई-वडिलांसोबतच तुम्हांला मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी असते आणि निवृत्तीनंतर स्वतःचा चरितार्थ चालवायचा असतो. कारण मुले आपली जबाबदारी स्वीकारतीलच असे गृहित धरून चालत नाही. पुन्हा निवृत्तीनंतर कुठेही कर्ज मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या निधीला कधीही हात लावू नका.

आई-वडिलांना आर्थिक मदतीचे मार्ग (भाग-2)

त्यांना पैसे देण्याऐवजी त्यांच्यासाठी पैसे द्या – अनेकदा तुमच्याकडून नियमितपणे पैसे घेणे आई-वडिलांना योग्य वाटत नाही. त्यामुळे त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम देण्यापेक्षा त्यांची फोनची बिले, वीजबिल, घराचा टॅक्स, विम्याचा वार्षिक हप्ता या गोष्टी तुम्ही थेट इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यातून भरू शकता. त्यांची दर महिन्याची औषधे किंवा अन्य वैद्यकीय खर्चाची जबाबदारी उचलू शकता. यातून त्यांच्यावरील आर्थिक ताण खूप कमी होतो. वर्षातून त्यांना एखाद्या सहलीला पाठवू शकता. त्यांना घरात आवश्यक असलेल्या वस्तू घेऊन देऊ शकता. मात्र काहीही झाले तरी त्यांना कर्ज म्हणून रक्कम देऊ नका किंवा त्यांच्याकडून घेऊ नका. कारण नात्यामध्ये दुरावा येण्यास कर्ज हा प्रकार सर्वाधिक कारणीभूत ठरू शकतो.

– चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)