तुमचे आईवडिल स्वतंत्र आणि स्वावलंबी आयुष्य जगत असतील आणि तुम्हांला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर तुमच्या बजेटवर ताण न येता आणि तुमच्या आर्थिक नियोजनाला धक्का न लावता तुम्ही त्यांना कशा प्रकारे सहाय्य करू शकता याविषयी…

आई-वडिलांना आर्थिक मदतीचे मार्ग (भाग-1)

आर्थिक बाबींमध्ये मदत – त्यांच्या गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे. मुदतठेवी वेळेत रिन्यू करणे, टपाल कार्यालयातील गुंतवणुकीकडे लक्ष ठेवणे या सगळ्यातून त्यांच्याकडून कुठलीही गोष्ट विसरली जाणार नाही. त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.

आर्थिक सल्लागाराबरोबर भेट – आई-वडिलांची एकूण गुंतवणूक त्यातून मिळणारा परतावा याचा विचार करून त्यांची आर्थिक सल्लागाराशी भेट घालून द्या. त्यामध्ये तुम्ही कुठलाही हस्तक्षेप किंवा सूचना न करता आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने त्यांना आवश्यक वाटल्यास ते त्यांच्या गुंतवणुकीची फेररचना करू शकतील.

स्वतंत्र खाते – तुम्हांला त्यांना नियमितपणे आर्थिक मदत करायची असेल किंवा त्यांच्यासाठी ठराविक रक्कम उभी करायची असेल किंवा दीर्घकाळ त्यांची काळजी घ्यायची असेल तर हा खर्च तुमच्या आर्थिक उद्दीष्टांमध्ये समाविष्ट करून त्यासाठी दर महिन्याला वेगळी रक्कम बाजूला ठेवा. खरे तर त्यासाठी वेगळे बँक खाते असले तर अधिक चांगले. त्यामुळे आई-वडिलांना किती रक्कम देणे तुम्हांला शक्य आहे ते त्यांना स्पष्ट होते. पुन्हा वेगळे खाते असले की तुमच्याकडून त्यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता नसते. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अशा प्रकारे नियोजन केले आहे म्हटल्यावर पत्नी किंवा अन्य कुणी त्यावर आक्षेप घेण्याची शक्यता नसते. हे खाते आईवडील आणि तुम्ही असे तिघेजण संयुक्तपणे चालवू शकता.

– चतुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)