आई-वडिलांची सेवाच खरी ईश्‍वरसेवा

नृवत्ती महाराज देशमुख : राजगुरूनगर येथे “मायबाप’ कार्यक्रम

राजगुरुनगर – आई-वडिलांच्या गालावरचे हसू हे मुलांसाठीची सर्वात मोठी श्रीमंती आहे. आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्‍वरसेवा असल्याचे प्रतिपादन समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत “मायबाप’ या विषयावर देशमुख बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, संस्था संचालक ऍड. मुकुंद आवटे, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा ऍड. राजमाला बुट्टेपाटील, ऍड.माणिक पाटोळे यांच्यासह सुमारे सात हजार विद्यार्थी आणि तीन हजार ग्रामस्थ उपस्थित होते.
निवृत्ती महाराज देशमुख म्हणाले की, कुटुंब व्यवस्था विचाराने कमजोर झाल्याने समाज विकासापासून वंचित राहत आहे. त्यासाठी सदविचारांना आजही समाजात किंमत आहे. सकारात्मक विचारांनी काम केले तर आदर्श नागरिक बनण्याची कुवत या सदविचारांमध्ये आहे. पालकांनीही आपल्या घरात मुलांना अभ्यासपूरक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे तरच मुले घडतील.
समाजात ज्ञानाला किंमत असून ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना आजही नोकऱ्या असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थी हा वर्गात किंवा क्रीडांगणावर असायला हवा. विद्यार्थी सर्वगुणसंपन्न तयार व्हावा यासाठी महाविद्यालय हे उर्जा निर्माण करणारे स्रोत असायला हवे. विद्यार्थ्यांना कष्ट, सदविचार, चांगले मित्र, अखंडाभ्यास या गोष्टी मोठे होण्यासाठी आवश्‍यक आहेत. अपयशाने खचून जाऊ नका. मुलांनी आई-वडिलांचा संभाळ करावा. प्रेरणादायी चरित्र पाठ करून आचरणात आणावे. व्यसनांच्या आहारी जाऊ नये. आणि योग्य शिक्षण व कष्ट करण्याची सवय अंगीकारून वर्तमान आयुष्य चांगले जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल कुलकर्णी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.धनंजय बोऱ्हाडे यांनी तर आभार प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील यांनी मानले.

  • मोबाईलचा अतिरेक नको
    मोबाईल ही गरज असली तरी त्याचा अतिरेक करू नये. मोबाईलच्या अतिरेकाने माणसामाणसातील संवाद संपत चालला आहे. निद्रानाशासाराखा आजार जडला आहे. शालेय जीवनातील मुलांचे मोबाईल पालकांनी वेळोवेळी तपासायची गरज आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)