पारगाव शिंगवे – आई-वडील हे आपले मूळ शिक्षक असून,त्यांचा आदर मुलांनी केलाच पाहिजे. दिवसभर मेहनत करून आणि आपल्या पोटाला चिमटे घेऊन ते आपल्या मुलांची स्वप्ने घडविण्यासाठी धडपड करीत असतात, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हाच संदेश दिला आहे, असे प्रतिपादन दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे विशेष कार्याधिकारी डॉ. बी. डी. चव्हाण यांनी केले.
आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात देशाचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला, यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बी. डी. चव्हाण बोलत होते.
शिक्षकदिनाच्या निमित्ताने यावेळी मुले शिक्षकांच्या भूमिकेत पाहावयास मिळाली. मुलांनी वर्गात शिकवण्याचे काम केले. या मुलांमध्ये प्राचार्य म्हणून अभिषेक येंधे आणि सागर लबडे यांनी काम पाहिले. शिक्षक म्हणून अक्षय गायकवाड, संकेत बोराडे, अभिषेक लोखंडे, शब्दाली वाळुंज, स्नेहल हांडे, माधुरी ढोबळे यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विविध देशात शिक्षकांना सर्वश्रेष्ठ पदे व मान दिला जातो. देशाच्या विकासाच्या दृष्टीने शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. यावेळी सूत्रसंचालन कोमल आदक यांनी केले तर अक्षय गायकवाड यांनी आभार मानले.

  • तालुक्‍यातील विद्यार्थ्यी झाले शिक्षक
    आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील पारगाव, शिंगवे, निरगुडसर, लोणी, धामणी, चांडोली, अवसरी, पिंपळगाव आदी महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि वर्गात मुलांनी शिक्षकाची भूमिका पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)