आई-वडालांच्या सेवतेच धन्यता मानावी

चिंबळी- मुलांनी आई-वडिलांची मनापासून सेवा करण्यात धन्यता मानावी, हीच खरी सामाजाची ओळख आहे. वृद्धाश्रमांची संख्या कमी हवी. आश्रमांच्या मदतीसाठी समजाने आत्मभाव ठेवावे, वृद्धाश्रमांमध्ये आपल्या जन्मदात्यांना ठेवण्यात नोकरवर्ग पिढी आघाडीवर आहे, हे चित्र बदलले पाहिजे. जगावर पेम करीत चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या क्रांतीकारक, राष्ट्रसंत व समाजसेवक यांच्या कार्याचा आदर्श घेतल्यास राष्ट्र बळकटीस मदत होईल, असे प्रतिपादन हभप गणेश महाराज वाघमारे यांनी केले.
चिंबळी (ता. खेड) येथे कड परिवाराच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कै. महादू विठ्ठल कड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी गणेश महाराज बोलत होते. याप्रसंगी सदाशिव कड, शरद कड, ज्ञानेश्‍वर कड, चांगदेव कड, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कड, संतोष कड, खेड तालुका कृर्षी उत्पन्न बाजूला समितीचे माजी सभापती विलास कातोरे, शांताराम सोनवणे, विनायक घुमटकर, राजूशेठ काझी, संपत विनोदे, बाळासाहेब विनोदे, अर्जुन अवघडे, शंकर जैद, आप्पासाहेब लोखंडे, हेमंत जैद, अप्पासाहेब बटवाल, बाळासाहेब जाधव, लक्ष्मण सोनवणे, हभप बळीराम महाराज मेहूणकर, रामचंद्र कातोरे, भानुदास कड, रामदास जाधव, प्रशांत कस्पटे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)