स्वयंभू सोमेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

करंजे- सोमवती अमावस्यानिमित्त श्रीक्षेत्र सोमेश्‍वर मंदिर (ता. बारामती) येथे सुमारे दहा हजार भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले. आज (सोमवार) पहाटे पाच वाजता स्वयंभू सोमेश्‍वराची पालखी नीरा स्नानासाठी रवाना झाली. स्नानझाल्यानंतर पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पालखीला येथील रवींद्र शिंदे, संदीप शिंदे, लक्ष्मण शिंदे आणि शिंदे कुटूंबातील सदस्यांना खांदेकरी म्हणून मान आहे. पालखी करंजे गावात आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या पालखी सोहळ्यात सोमेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष विनोद भांडवलकर, सचिव सुनिल भांडवलकर, विश्‍वस्त ऍड. गणेश आळंदीकर, बाळासाहेब भांडवलकर, सतिश भांडवलकर, दत्ता गोरे आणि भाविक सहभागी झाले होते.सोमेश्‍वर मंदिरात पालखी सोहळा आल्यानंतर श्रीगोंदा येथील शिवभक्‍त राम खेडकर यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या शिवभक्तानी यावेळी हरहर महादेवचा गजर करीत शिवलिंगाचे दर्शन घेतले. प्रचंड उन्हातही भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. तर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षीतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)