आई मधला शिक्षक जागा पाहिजे-रामथिर्तकर

रेडा- आपल्या मुलींची जडणघडण करताना, भारतीय संस्कृती जपत शिक्षणाबरोबर घरपण टिकवण्यासाठी आई मधला शिक्षक जागा पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामथिर्तकर यांनी केले.
काटी येथिल ग्रीन काटी सोशल फाऊंडेशनच्यावतीने सर्व महापुरूषांची जयंती एकत्र साजरी करण्यात आली. त्या वेळी ज्येष्ठ समाज सेविका रामथिर्तकार व्याख्यानात बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रात बाजी मारलेल्या अधिकारी व विद्यार्थी यांचा विषेश गौरव करण्यात आला. यावेळी माजी सभापती विलासराव वाघमोडे, आदर्श शेतकरी साहेबराव मोहिते, मोहन गुळवे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामथिर्तकर म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांना अशी खात्री होती की, महिला शिकल्या तर आदर्श कुटुंब व्यवस्था निर्माण होईल व सुसंस्कृत पिढीं निर्माण होईल. हाच विश्वास जपण्यासाठी घरातील आई पासून सुरवात झाली पाहिजे. यावेळी डॉ. नेहा मोहिते, डॉ. पुजा भोसले, डॉ.अदित्य गुळवे, डॉ. पुजा भोसले, डॉ. आरती वाघमोडे, पुजा ठवरे, राहुल फुगे, अमेय भोसले, हर्षवर्धन भोसले यांचा विषेश सन्मान करण्यात आला. प्रस्ताविक विपुल वाघमोडे यांनी केले तर सुत्रसंचालन आभार प्रा.नितिन भोसले यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)