आई प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद : संजीवराजे

विडणी – आई प्रतिष्ठानच्या आदर्श समाज निर्मितीचे काम माध्यमातून होत असून प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. वाठार निंबाळकर येथील आई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी संजीवराजे ना. निंबाळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आई प्रतिष्ठान शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यातही कार्यरत आहे.

याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश तांबे व सहकारी यांचे संजीवराजे यांनी अभिनंदन केले. जि. प. सदस्य दत्ताबापू अनपट, सभापती दत्तात्रय गुंजवटे, परशूराम फरांदे, भानुदास सरक, नंदूभाऊ नाळे, अशोक निंबाळकर, सौ. शोभादेवी नाईक-निंबाळकर, सौ. शारदा भोईटे, राजीव नाईक-निंबाळकर, प्रा. व्ही. एम. निंबाळकर यांची होती. कार्यक्रमात सचिन यादव, रविंद्रकुमार लटिंगे, बाळासाहेब खाडे, अंजली गोडसे, चंद्रकांत मोरे, सुनिल शेडगे, यशवंत कदम, भोलचंद बरकडे, संजय जाधव, निलम भोसले, संतोष मोहिते, सचिन काकडे, रामदास जगताप, पोपटराव पवार, ऍड. सचिन शिंदे, डॉ. रविंद्र बिचुकले, मारूती ढगे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)