आईसलॅंडमध्ये अपघातात तीन भारतीयांचा मृत्यु 

वर्षभरात रस्ते अपघातात 18 परदेशी नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली – आईसलॅंड येथे टोयोटा लॅंड क्रूजर गाडीची पुलाच्या कठड्याला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. तसेच या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यात मूळ भारतीय वंशाच्या दोघांचा समावेश आहे. जखमींना हवाईमार्गे आईसलॅंडची राजधानी रेकजाविक येथील इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. स्थानिक पोलिसांनी अद्याप मृतांची नावे जाहीर केलेली नाहीत.

लंडन येथून दोन दांपत्य आपल्या मुलांसह नार्डिक देशात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यांनी फिरण्यासाठी टोयोटा लॅंड क्रूजर गाडी भाड्याने घेतली होती. मात्र, एकेरी वाहतूक असलेला पूल ओलांडून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी पुलाच्या कठड्याला धडकून खाली कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच आईसलॅंड येथील भारतीय राजदूत टी आर्मस्ट्रॉंग चंगसन यांनी इस्पितळात जाऊन जखमींची भेट घेतली. ही एक दुःखद घटना आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जवळचे संबंध असलेले कुटुंबीय लंडनमध्ये एकत्र आले होते. यात 30 वयोगटातील दोन दांपत्य, 3, 8 आणि 9 वर्ष वयाची तीन मुले होती. यातील सर्वात कमी वयाच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर एका मुलीवर उपचार सुरू आहेत अशी माहिती चंगसन यांनी दिली आहे. आईसलॅंडमध्ये वर्षभरात झालेल्या रस्ते अपघातात 18 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)