आईला नेहमी खुश ठेवीन – सई ताम्हणकर

गेल्या काही दिवसांपासून संजय मोने यांच्या कानाला खडा या आगामी चॅट शोची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारणार आहेत. कानाला खडा लावणारे काही किस्से या गप्पांमध्ये रंगणार आहेत. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ३० नोव्हेंबर पासून शुक्रवार व शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणार आहे आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांची मैफिल प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात तरुणांच्या हृदयाची धाडकन सई ताम्हणकर संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी सज्ज होणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई हिने एका पेक्षा एक सुपरहिट सिनेमे देऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिचं सौंदर्य आणि कमालीचं अभिनय कौशल्य यामुळे तिने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी इतकंच नव्हे तर तामिळ सिनेसृष्टीत देखील स्वतःची छाप सोडली आहे. तिच्या आजवरच्या प्रवासात असे अनेक किस्से आहेत ज्यामुळे तिने कानाला खडा लावला. तिने सिनेमात बिकिनी घातली आणि त्यामुळे झालेला बोभाटा, तिचे मित्र-मैत्रिणी, तिचा सांगली ते मुंबईचा प्रवास या सगळ्याबद्दल तिने दिलखुलास गप्पा मारल्या आणि संजय मोनेंशी गप्पा मारताना सईने तिच्या आईला नेहमी खुश ठेवण्याचा कानाला खडा लावला, असं म्हंटल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)