आईच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने मुलाची आत्महत्या

वाई, दि. 5 (प्रतिनिधी) – आईचा मृत्यू झाल्याने धक्‍का सहन न होवून धर्मपुरी वाई येथील मुलाने आत्महत्या केली. संदीप रमाकांत प्रभुणे वय 48 असे त्यांचे नाव आहे.
वाई पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, संदीप प्रभुणे यांची आई कमल रमाकांत प्रभुणे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. मुलगा संदीप त्यांची सेवा करत होते. बुधवार, दि. 5 रोजी सकाळी बारा दरम्यान घरकाम करणारी बाई घरकाम करण्यासाठी आली असता. घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता संदीप प्रभुणे यांनी खोलीत गळाफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. संदीप प्रभुणे हे अविवाहित होते. त्यांना एक भाऊ असून नोकरीनिमित्त नाशिक येथे वास्तव्यास आहे. याबाबतची फिर्याद नितिन किसन जगताप रा. पदमावती अपार्टमेंट धर्मपुरी, वाई यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली. तपास सहा. पो. कॉ. आर.एच. यादव करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)