आईच्या डोळ्यात चाकू खुपसून डोळे फोडले

पिंपरी – स्वतःच्या आईच्या डोळ्यात मनोरुग्ण मुलाने चाकू खुपसून तिचे दोन्ही डोळे फोडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे घडली.

सुमन सावंत (वय 75, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी झालेल्या वृद्ध आईचे नाव आहे. तर भूपेंद्र सावंत (वय 35) असे मनोरुग्ण मुलाचे नाव आहे. भूपेंद्र या प्रकारानंतर घरातून निघून गेला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यांचे पती मुंबईला कामानिमित्त असतात. भूपेंद्र हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचार सुरु होते. मागील काही दिवसांपूर्वी भूपेंद्रला घरी आणले होते. घरी आणल्यानंतर तो बराच काळ घराबाहेर घालवत असे. शनिवारी सुमन घरी एकट्याच होत्या. दुपारच्या वेळी भूपेंद्रने चाकू घेऊन आईच्या दोन्ही डोळ्यात खुपसला यामध्ये सुमन त्यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली. दरम्यान, भूपेंद्रने घरातून धूम ठोकली. शेजा-यांना घटनेची माहिती होताच सुमन यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटच्या मनोरुग्ण मुलाकडून ही चूक झाली असल्याने सुमन यांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)