आईचा वाढदिवस साजरा करायला निघालेल्या भारतीयाचा अमेरिकेत खून

गेल्या 30 वर्षांपासून अमेरिकेतील अटलांटिक काउंटी येथे वास्तव्यास असणाऱ्या सुनील एडला नामक भारतीय वंशाच्या ६१ वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरापाशी गोळ्या झाडून खून करण्यात आला. सुनील हे अटलांटिक सिटीच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये ते कामाला होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरूवारी रात्री सुनील आपल्या घरातून  रात्रपाळीवर निघाले असता त्यांनी आपली कार सुरू केली पण पुन्हा ते कारमधून उतरून घरात गेले. त्यानंतर पुन्हा कारकडे निघाले असताना त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळ्या झाडण्यात आल्या.

सुनील यांची हत्या केलेला आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार सुनील यांचा खून त्यांची कार चोरण्यासाठी करण्यात आल्याची शक्यता असून सदर अल्पवयीन आरोपीवर खून, लुटमार, कार चोरी करणे आणि बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे आरोप लावण्यात आले आहेत.

सुनील यांच्या आईचा 27 नोव्हेंबर रोजी 95 वा वाढदिवस आहे, आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सुनील काही दिवसांमध्येच भारतात परतणार होते मात्र आता त्यांची इच्छा अपूर्णच राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)