आंब्याच्या अतिरिक्त आवकेसाठी पर्यायी जागा

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न

पुणे- सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परिणामी व्यापाऱ्यांना गाळ्यावर आंबा ठेवण्यासाठी जागा कमी पडण्याची शक्‍यता आहे. बाजारात वाहतुक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने आंबा व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरवर्षी बाजारात आंब्याचा हंगाम सुरु झाल्यानंतर 15 एप्रिल नंतर मोठ्या प्रमाणात कर्नाटक आणि रत्नागिरी हापूस, पायरी आणि इतर प्रकारच्या आंब्याची आवक होते. मे महिन्यात तर दररोज 50 ते 60 हजार पेट्याची आवक होत असते. त्यामुळे बाजारात होणाऱ्या वाहतुक कोंडीचा सामना शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही करावा लागतो. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच बाजार समितीने व्यापाऱ्यांसमोर पर्यायी जागेचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यास व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
वाहतुक कोंडीसह इतर समस्या सोडविण्यासाठी बाजार समितीने नियमावली तयार केली असून, त्यामध्ये 15 फुटांपेक्षा पुढे माल ठेवता येणार नसल्याचा नियम आहे. मात्र, आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हा नियम पाळणे शक्‍य नसते. या पार्श्‍वभूमीवर ही अतिरिक्त आवक बाजार समितीच्या केळी बाजाराच्या पाठीमागे म्हणजेच जनावरांच्या बाजाराशेजारी ठेवता येणार आहे. याठिकाणी आडत्यांना शेड बांधून देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी, सुरक्षा आदी सुविधाही दिल्या जाणार आहेत. या प्रस्तावास लवकर मुर्त स्वरुप प्राप्त झाल्यास व्यापारास चालना मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे

बाजारात आंब्याची आवक लवकरच वाढणार आहे. त्यावेळी पुन्हा वाहतुक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. हे टाळण्यासाठी अतिरिक्त झालेली आंब्याची आवक ठेवण्यासाठी आडत्यांना पाण्याच्या टाकीपासून गेटक्रमांत सातपर्यंत असणारी 15 ते 20 गुंठे जागा देण्यात येणार आहे. त्या जागेत जागेत पत्र्याचे शेड मारुन, देण्यात येणार आहेत. याबाबतची कार्यवाही लवकरच पुर्ण होईल.
-बी.जे. देशमुख, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.

 

रत्नागिरी, कर्नाटक हापूसच्या भावात घट
रविवारी मार्केटयार्डात रत्नागिरी हापूसच्या पेटीची 2 हजार ते 2100
पेट्यांची आवक झाली. तर कर्नाटक हापूसच्या 2 डझनाच्या 600 ते 700 बॉक्‍सची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कर्नाटक आणि रत्नागिरी हापूसच्या  भावात घट झाली आहे. रत्नागिरी हापूसच्या 4 ते 8 डझनाच्या कच्चा मालास  1500 ते 3500 रुपये भाव मिळाला. तर तयार मालास 2 हजार ते 4 हजार रुपये भाव  मिळाल्याचे रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तर कर्नाटक हापूसला कच्च्या मालास चार डझनास 1500 ते 2000 रुपये, तर तयार मालास 2 ते अडीच हजार रुपये भाव मिळाला. कर्नाटक पायरीस कच्च्या मालास दोन डझनास 1000 ते 1500 रुपये, तर
तयार मालास 1500 ते 2000 रुपये भाव मिळाल्याची माहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)