आंबोली येथे दोन गटांमध्ये हाणामारी

जुन्नर -आंबोली (ता. जुन्नर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्‌घाटनाच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी, शिवीगाळ झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत दोन्ही गटांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुन्नरच्या पश्‍चिम आदिवासी भागातील आंबोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीच्या उद्‌घाटनावेळी माहिती अधिकारी कार्यकर्ते निलेश भालचिम हा त्याच्या मोबाईलवर या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत होता. त्याला चित्रीकरण करू नको असे आयोजक सांगत असतांना सरपंच दिपाली दाते व अन्य सहकाऱ्यांसमवेत त्याचा वाद झाला. या वादाचे रुपांतर कार्यक्रम झाल्यानंतर उशिराने हाणामारीत झाले.

सरपंच दिपाली दाते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निलेश भालचीम व त्याच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची तक्रार निलेश भालचीम याने जुन्नर पोलीस ठाण्यात दिली. तर निलेश भालचीम व किरण भालचीम यांनी विनयभंग केल्याची तक्रार सरपंच दिपाली दाते यांनी दिली. या तक्रारीवरून जुन्नर पोलीस ठाण्यात भालचीम बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्नर पोलिसांनी निलेश भालचिम व किरण भालचिम यांना अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन. बी. खंडागळे करीत आहेत.
या वादामुळे आरोग्य केंद्राच्या उद्‌घाटन वादात सापडले असून या कामाच्या गुणवत्तेबाबत निलेश भालचीम याने यापूर्वी तक्रारी केल्या होत्या. तसेच गावात विविध गैरप्रकार तो उघडकीस आणत असल्यानेच त्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची चर्चा गेली दोन दिवस सोशल मीडियावर होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)