आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

पाईट- खेडच्या पश्‍चिम भागातील आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रत गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी व प्रसूतीनंतर मोटारसायकलवरून ने आण करण्याचा अजब प्रकार लक्षात येताच आंबोली मधील धर्मवीर संभाजी राजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने टाळे ठोकण्यात आले.
संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसताना परिचारिकाकडून कोणताही डिस्चार्ज पेपर न बनवता अरुणा पांचाळ या महिलेला प्रसूतीच्या तिसऱ्या दिवसानंतर कोणतेही औषध न देता घरी जाण्यास संगितल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आदिवासी भागातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य चांगले राहावे व गरीब जनतेला मोफत औषधोपचार व्हावेत यासाठी आंबोली या मध्यवर्ती गावात प्राथमिक आरोग्य केंद्र गेले वर्षे कार्यरत आहे; परंतु येथे कायमस्वरूपी डॉक्‍टर नसून आहेत ते वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून तीन-चार दिवस गैरहजर असल्याने या भागातील नागरिकांना “नसून अडचण आणि असून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील संजीवनी मानली जाते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ, नये गोरगरिबांना मोफत उपचार व्हावेत हा या मागचा हेतू असून या हेतुलाच हरताळ फसल्याचे विदारक चित्र आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून येत आहे.
वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसताना या आरोग्य केंद्रातील सेविकावैद्यकीय अधिकाऱ्यांची कामे करताना दिसून येतात, तर येथील स्वच्छता कर्मचारी वार्डबॉयचे काम करीत असल्यामुळे रुग्णांना बरे होण्याऐवजी आणखी दुसऱ्या आजारांना बळी पडावे लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातिल कर्मचारी रुगणांच्या जीवनाशी खेळ खेळत असल्याने रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका कायमचीच सलाईनवर असते. गेल्या पंधरा दिवसांपासून ती बंद असून त्या संदर्भात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी रुग्णवाहिका सुरू असून ती बंद असल्याबाबत कोणतेही निवेदन आले नसल्याचे स्पष्ट केले.

  • जोपर्यंत या आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळत नाही तोपर्यंत या भागातील नागरिकांचे असेच हाल होत राहतील त्यामुळे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा
    – कैलास शिंदे, संचालक, प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबोली
  • मागील प्रसूतीच्या वेळेसही मला मोटारसायकलवरून आणण्यात व नेण्यात आले होते त्यावेळीही मला खूप त्रास झाला.
    – अरुणा पांचाळ, रुग्ण
  • संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येइल.
    – डी. के. माने, जिल्हा वैद्यकिय अधिकारी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)