आंबेनळी घाटात ट्रक कोसळला, चालकासह क्‍लिनरचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर, दि. 2 (प्रतिनिधी) – रोहा येथून महाबळेश्‍वरच्या दिशेने निघालेला मालट्रक आंबेनळी घाटात बावली गावच्या हद्दीत सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचालक प्रशांत शंकर जाधव (वय 35, रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव) व क्‍लिनर रमजान शेख (वय 60, रा. गुरुवारपेठ, सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, सातारा येथील धैर्यशील भोसले यांच्या मालकीचा 14 चाकी माल ट्रक (एमएच 11 सीएच 1989) बुधवारी पहाटेच्यावेळी चालक प्रशांत जाधव आणि क्‍लिनर रमजान शेख हे रोहा येथून फरशी घेऊन महाबळेश्‍वरकडे येत होते. ट्रक आंबेनळी घाटात बावली गावच्या हद्दीत आला असताना एका अवघड वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. ट्रकमध्ये भरलेल्या सुमारे 30 ते 40 टन फरशीखाली चालक आणि क्‍लिनर सापडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच पोलादपूरचे तहसीलदार शिवाजी जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार आणि महाबळेश्‍वर पोलीस ठाण्याचे चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. यावेळी सह्याद्री ट्रेकर्स व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या संजय पारठे व सुनील भाटिया, यांच्या टिमनेही मदतकार्यात सहभाग घेतला. सकाळी 8 वाजता मदत कार्याला सुरुवात केल्यानंतर पहिला मृतदेह सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास तर दुसरा मृतदेह संध्याकाळी 4 वाजता काढण्यात यश आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)