आंबेनळी अपघातप्रकरणी सहा महिन्यांनंतर चालकावर गुन्हा

महाबळेश्‍वर – आंबेनळी घाटातील बस अपघात प्रकरणी सहा महिन्यांनंतर बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाच महिन्यांपूर्वी 28 जुलै रोजी आंबेनळी घाटामध्ये बसदरीत कोसळून झालेल्या अपघातात कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी मृत चालक प्रशांत भांबीडवर पोलादपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापिठातील कर्मचाऱ्यांची खासगी बस 30 कर्मचारी घेवुन महाबळेश्‍वर सहलीला निघाली होती ही बस शनिवारी सकाळी साडे दहा च्या सुमारास अंबेनळी घाटातील दाभिळ गावाच्या हद्द्‌ीत सुमारे सहाशे फुट खोल दरीत कोसळली होती या भिषण अपघातात बस मधील दोन चालकासह 30 जण या अपघातात जागीच ठार झाले होते तर कोकण कृषी विदयापीठाचे सहा अधिक्षक प्रकाश सावंत देसाई हे आश्‍चर्यकारक रित्या बचावले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघाताबाबत अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले होते. आता मात्र पाच महिन्यांनी मृत चालक प्रशांत भांबीड यांच्यावर पोलादपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवण्याचा ठपका ठेवला आहे. बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांच्यावर संशयाची सुई होती मात्र आता भांबीडवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)