आंबेडकर स्मारकाबाबत सरकारकडून फसवणूक – नवाब मलिक

मुंबई: ६ डिसेंबर किंवा १४ एप्रिल जवळ येताच राज्य सरकार इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात करते. त्यानंतर पुढे वर्षभर काहीच होत नाही. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन इंदू मिल येथे करण्यात आले होते. पण, पुढील तीन वर्षांत कोणतीही हालचाल झालेली नाही, कोणतेही आदेश किंवा कामाचे टेंडर निघत नाहीत. मात्र ६ डिसेंबर आल्यावर कामाची हालचाल दाखवून हे सरकार लोकांची फसवणूक करते आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

इंदू मिलच्या जागेवर खरोखरच स्मारक बांधणार का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. निवडणुकीत फयदा मिळवण्यासाठीच भूमिपूजन करण्यात आले, असेही मलिक म्हणाले. देशभरात दलित भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र दिसते आहे, असे सांगतानाच हा प्रकल्पच अडकवून ठेवण्याचा सरकारचा डाव आहे का, हे सरकारनेच स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे मतही मलिक यांनी व्यक्त केले.

पूर्वी आपल्या देशात राज्याच्या तिजोरीतून मंदिर-मशिदीसाठी मदत करण्याची भूमिका होती. हे सरकार मात्र याविरुद्ध भूमिका घेते आहे. हे सरकार देवस्थानाकडूनच प्रकल्पासाठी पैशाची मागणी करते आहे. राज्यात दुष्काळाचे सावट असतानाही सातवा वेतन लागू करुन राज्याच्या तिजोरीतून पैसा काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

आंबेडकर स्मारकाबाबत सरकारकडून फसवणूक – नवाब मलिक

आंबेडकर स्मारकाबाबत सरकारकडून फसवणूक – नवाब मलिक६ डिसेंबर किंवा १४ एप्रिल जवळ येताच राज्य सरकार इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात करते. त्यानंतर पुढे वर्षभर काहीच होत नाही. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन इंदू मिल येथे करण्यात आले होते. पण, पुढील तीन वर्षांत कोणतीही हालचाल झालेली नाही, कोणतेही आदेश किंवा कामाचे टेंडर निघत नाहीत. मात्र ६ डिसेंबर आल्यावर कामाची हालचाल दाखवून हे सरकार लोकांची फसवणूक करते आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते Nawab Malik यांनी केली आहे. इंदू मिलच्या जागेवर खरोखरच स्मारक बांधणार का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. निवडणुकीत फयदा मिळवण्यासाठीच भूमिपूजन करण्यात आले, असेही मलिक म्हणाले. देशभरात दलित भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र दिसते आहे, असे सांगतानाच हा प्रकल्पच अडकवून ठेवण्याचा सरकारचा डाव आहे का, हे सरकारनेच स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे मतही मलिक यांनी व्यक्त केले.पूर्वी आपल्या देशात राज्याच्या तिजोरीतून मंदिर-मशिदीसाठी मदत करण्याची भूमिका होती. हे सरकार मात्र याविरुद्ध भूमिका घेते आहे. हे सरकार देवस्थानाकडूनच प्रकल्पासाठी पैशाची मागणी करते आहे. राज्यात दुष्काळाचे सावट असतानाही सातवा वेतन लागू करुन राज्याच्या तिजोरीतून पैसा काढण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप मलिक यांनी केला.#InduMill #DrBabasahebAmbedkar #Monument

Posted by Nationalist Congress Party – NCP on Wednesday, 5 December 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)