आंबेडकर जयंतीनिमीत्त संतोष जुवेकर व कमलाकर सातपुते उद्या संगमनेरमध्ये

 भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन

संगमनेर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त उद्या शनिवार दि.14 एप्रिल रोजी सकाळी 9.00 वा. आमदार बाळासाहेब थोरातआमदार डॉ.सुधीर तांबे यांचे उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार असून ,सकाळी 10.00 वा सिने अभिनेता संतोष जुवेकर व कमलाकर सातपुते यांच्या उपस्थितीत यशोधन संपर्क कार्यालयापासून भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुधारकराव रोहम यांनी दिली.

 काँग्रेसनेते  बाळासाहेब थोरात यांच्या  मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात शनिवारी संगमनेरात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन, 10 वा. आमदार बाळासाहेब थोरात यांचे यशोधन संपर्क कार्यालयापासून सिने अभिनेते संतोष जुवेकर कमलाकर सातपुतेमा.मंत्री बाळासाहेब थोरातआ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबेथोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरातसामाजिक कार्यकर्ते निवृत्ती भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोटार सायकल रॅलीचा शुभारंभ

दुपारी 12 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीची सांगता सभा व गरीब विद्यार्थ्यांचे उत्सव समिती तर्फे पालकत्व प्रत्येकी रु. 11000 /-शैक्षणिक खर्च रोख स्वरुपात दिला जाणार आहे. तसेच सायं 5.00 वा. बुध्द विहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या विविध कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरीक बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन अध्यक्ष सुधाकर रोहम, सचिव प्रविण गायकवाड, राजु खरात, मंजाबापू साळवे, सुनिल रुपवते आदिंसह विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व संगमनेर शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)