आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

* बाबासाहेबांच्या पहिल्या पुतळ्यावर ब्रांझ छत्री
* संविधानाची प्रस्तावना व जीवनपटही बसविणार

* 14 एप्रिलला रोजी येणाऱ्या अनुयायांना योग्य सोयीसुविधा पुरवण्याचा सूचना
मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मृतिस्थळ असणाऱ्या चैत्यभूमी येथे कार्यक्रमानिमित्त पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी कुपरेज गार्डन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर ब्रांझची छत्री बसविण्यासंदर्भात तसेच इतर सोयीसुविधा पुरविण्यासंदर्भात सूचना केल्या.
फडणवीस म्हणाले, मादाम कामा रोडवरील कुपरेज गार्डन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्यावर छत्री बसविण्यात येणार आहे. या छत्रीचे उद्‌घाटन येत्या 14 एप्रिल रोजी करण्यासाठी योग्य ती पूर्वतयारी करावी. जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना परवानगी देण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी नियमानुसार मिरवणुका काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने पुढाकार घ्यावा. 14 एप्रिल रोजी दूरदर्शनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तसेच लोकराज्य मासिकाचा विशेष अंक काढण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. चैत्यभूमी येथील स्तुपाचे कामही यावर्षी पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी महानगरपालिकेस दिल्या आहेत.
इंदू मिल जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असून या स्मारकाच्या आराखडा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अंतिम केला आहे. इंदू मिल स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम येत्या दीड वर्षात करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण काम दोन ते सव्वा दोन वर्षात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसात या जागेचे हस्तांतरण पत्र राज्य शासनाला मिळणार असल्याचेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)