आंबेडकर, ओवेसींची आज साताऱ्यात सभा

सातारा – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर नव्याने निर्माण झालेल्या वंचीत आघाडीची आज सभा होणार आहे. यावेळी वंचीत आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते ओवेसी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता गांधी मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

आगामी निवडणुकांना समोरे जाताना महाराष्ट्रातील भारिप बहुजन महासंघ व हैदराबाद येथील एमआयएम या दोन पक्षांसह इतर घटक पक्षांनी वंचीत बहुजन आघाडी स्थापन केली आहे. महाराष्ट्रभर या आघाडीच्या सभा होत आहेत. त्यानंतर या आघाडीचा विजय संपादन निर्धार मेळयाची सभा आज साताऱ्यातील गांधी मैदानावर होत आहे. खा.ओवेसी यांची प्रखर विरोधाची भाषा अन्‌ प्रकाश आंबेडकरांचा निशाणा नेमका कोणाच्या विरोधात असणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान या सभेसाठी सातारा पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)