आंबेडकरांच्या विचारांनुसार मार्गक्रमण करुनच देश प्रगतिपथावर -बडोले

अलिबाग : चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य-समता, न्याय आणि बंधूता या विचारांची चेतना दिली. या विचारांनुसार मार्गक्रमण करुन देश प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळे येथे 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह केला होता. या क्रांतीकारी घटनेच्या आठवणी जागवण्यासाठी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना बडोले म्हणाले की, चवदार तळे येथील सत्याग्रहातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या विचारांची जी चेतना दिली ती पक्ष, जाती धर्मा पलीकडील होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा विचारच देशाला पुढे प्रगतीपथावर नेईल. डॉ. बाबासाहेबांचे विचार रुजविण्याचा प्रयत्न बार्टी ही संस्था करत असून या संस्थेमार्फत विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कामही करत आहे. याच माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महाड येथील हे क्रांतीकारी स्मारकही राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी विकास करु.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)