आंबेडकरांच्या लाटेत सहभागी व्हा : लक्ष्मण माने

उंब्रज – महाराष्ट्रात स्व. यशवंतराव चव्हाण यांनी लाखो लोकांचे संसार उभे केले पण त्यांच्यानंतर भांडवलदारांच्या नादाला लागून राज्यकर्त्यांनी संपूर्ण देशाचे नुकसान केले आहे. आज 99 टक्के लोकांकडे चार आणे संपत्ती आहे. भांडवलदारांकडून पैसा आणायचा आणि वंचितांना विकत घ्यायचे.

ही पध्दत जर बंद करायची असेल तर आज राज्यभर बाळासाहेब आंबेडकर यांची लाट आहे. या लाटेत सहभागी व्हावे, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले. येथे आयोजित भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा समन्वयक बाळकृष्ण देसाई, भरत लोकरे, सुर्यकांत पवार, तालुकाध्यक्ष संतोष किरत यांची प्रमुख उपस्थिती होती.

लक्ष्मण माने म्हणाले, आमच्या तरुणांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर ते परवडणारे नाही आणि शिक्षण घेतले तर त्याला नोकरी नाही. कारण या देशातील नोकऱ्यांचे खासगीकरण करून भांडवलदारांच्या घशात घातल्या गेल्या आहेत. उच्च शिक्षण घेऊन आमचे तरुण बेकार आहेत. शेतकऱ्यांची याहून भयानक परवड आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या शेतीमालाला भाव नाही.

दुकानदार इतर व्यावसायीक मॉल पद्धतीमुळे गिऱ्हाईकांची वाट बघत बसले आहेत. यासर्व परस्थितीवर मात करण्याची वेळ आली असून वंचितांनी मोठ्या शक्तीने एकत्र येणे गरजेचे आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक चंद्रकांत खंडाईत म्हणाले, या देशातल्या वंचितांना लोकशाहीच्या प्रवाहामध्ये आणले पाहिजे म्हणूनच सातत्याने प्रयत्न करणारे बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिग्गज नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हाक दिली आहे.

आपल्या हक्काचे सरकार बनविण्याकरीता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपणाला मतांचा अधिकार दिला. तो कुणाच्या घरात पाणी भरण्यासाठी दिलेला नाही. तर तुम्हाला राजा बनविण्याकरीता दिलेला आहे. परंतु आज आम्हाला खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या परंपरेला खिंडार पाडणे गरजेचे आहे. ती पारंपरिक मानसिक गुलामी आपण सोडली पाहिजे. गुलामीची बेडी तोडायची असेल तर देशातील सर्व वंचितांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपल्या हक्काचे, स्वाभिमानाचे सरकार आपला एक ही रुपया खर्च न करता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतांचा अधिकार वापरुन आणू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम बैले यांनी केले. तर संतोष किरत यांनी आभार मानले. या प्रसंगी उंब्रज परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
37 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)