आंबेडकरांच्या नावावरून योगी सरकारचं राजकारण – आनंदराज आंबेडकर

लखनऊ –  योगी सरकारनं उत्तरप्रदेशमध्ये सर्व सरकारी कागदपत्रांवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव लिहिताना ‘भीमराव रामजी आंबेडकर’ असं नाव वापरण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना दिलेत. उत्तर प्रदेश सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात केलेल्या या बदलावर बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

दलितांची सहानुभूती मिळवण्यासाठी राजकीय फायद्यासाठी भाजप सरकारनं ही खेळी केल्याचा आरोप आनंदराज आंबेडकरांनी केलाय. राम मंदिराचा मु्द्दा गाजत असल्यामुळेच रामजी नाव आंबेडकरांना जो़डून राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. ‘भीमराव आंबेडकर हे एक केवळ नाव आहे. ती ‘विचारधारा’ नाही. समता, न्याय, बंधुता या पायांवर त्यांनी आपली विचारधारा मांडली होती. उत्तरप्रदेशात कळीचा मुद्दा ठरलेल्या राममंदिराचा प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन भाजप सरकारनं आंबेडकर या नावाला ‘राम’ जोडण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)