मंचर-समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण याविषयी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक, स्फूर्तीदायी आहे, असे मत महाराष्ट बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव थोरात यांनी शनिवारी (दि. 14) व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे महाराष्ट्र बलुतेदार संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत थोरात यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून नारळ फोडण्यात आला. मंचरचे उपसरपंच महेश थोरात, प्रवीण थोरात, सुनील साळवे, प्रसाद थोरात, ज्ञानेश्वर गाडेकर, दिलीप लोंढे, अभिजीत गायकवाड, कृष्ण आंद्रे, तानाजी माशेरे, ईश्वर शेवाळे, दत्तोबा लोखंडे, बबन टेमकर, नवनाथ शिंदे, रिजवान शेख, सचिन थोरात, परेश थोरात, सुनील थोरात, कैलास शेगर, सागर शेगर आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा