आंबेगाव-शिरूर मध्ये विकासकामांना गती : रमेश खिलारी

अवसरी- विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघात विकास कामांना नेहमीच प्राधान्य दिले जात आहे. सध्या पाणी, रस्ते या कामांना गती देण्याचे काम सुरू आहे. वाडी-वस्त्यांवर डांबरी रस्ते पोहचले आहेत. यामुळे दळणवळनाचा वेग वाढला आहे, असे प्रतिपादन खरेदी-विक्री संघाचे संचालक रमेश खिलारी यांनी केले.
मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील रणपिसेवस्ती ते पाझर तलाव या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रमेश खिलारी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक संजय गोरे, बाळासाहेब मेंगडे, सरपंच शुभांगी गवारी, माजी सरपंच जिजाभाऊ मेंगडे, पोपट मेंगडे, विशाल गवारी, सुभाष दांगट समवेत ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत सन 2017-18 मध्ये रणपिसेवस्ती ते पाझर तलाव हा रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा रस्ता मंजूर होण्यासाठी माजी सरपंच भरत फल्ले व ग्रामस्थांनी वेळोवेळी वळसे पाटील तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)